कोल्हापूर (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील एका युवतीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्याचा निषेध करत आज (मंगळवार) दसरा चौक येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समिती या दोन्ही पक्षाच्या वतीने दसरा चौकात निदर्शने करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मालिकमी कुटुंबातील युवतीवर सामूहिक अत्याचार करून तिची अमानूषपणे हत्या केली होती. तसेच पोलिसांकडून तिच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावली होती. हे इतके गंभीर प्रकरण असतानाही देखील या प्रश्नावर गंभीर दखल न घेता दडपशाहीचा वापर केला जात आहे. याचा निषेध करत आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी व कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समिती या दोन्ही पक्षाच्यावतीने हाथरस अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करावे. तसेच अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी यावेळी करत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, प. म. अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, अध्यक्ष हातकणंगले विद्याधर कांबळे, कोल्हापूर शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव, कोल्हापूर जिल्हा बुद्ध अवशेष व विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कांबळे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.