कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांचे कार्यकर्ते व नागरिकांच्या गर्दीमुळे होणारा पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या हेतूने रोट्रॅक्ट मुव्हमेंट इन कोल्हापूर या क्लबसच्या सदस्यांनी पोलिस मित्र हा उपक्रम राबविला.

इराणी खण परिसरात तब्बल सहा तासांहून अधिक काळ सर्व रोट्रॅक्टर्संनी रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रण, गर्दी कमी करणे, पोलिस दलाच्या सूचनेनुसार विसर्जनासाठी आलेल्या मंडळाचे ट्रॅक्टर, तसेच विसर्जन करन आलेल्या ट्रॅक्टर्संना मार्गस्थ करण्याची कामे केली. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. रोट्रॅक्ट क्लबच्या महिला सदस्य व मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. मुलींनी नागरिकांची होणारी गर्दी कमी करत योग्य नियोजनातून परिस्थिती सांभाळली. आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, उत्तरच्या आ. जयश्री जाधव आदिंनी क्लब सदस्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.