कोल्हापूर (प्रतिनिधी ) : मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्याध्यापक संघ हॉल शिवाजी पार्क येथे गौरव मराठीचा ह्या विषयावर कवी संमेलन तसेच चर्चासत्राचे आयोजन केले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नियोजन अमोल पराडकर आणि रोहिणी अमोल पराडकर यांनी उत्कृष्टरित्या केले. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पाटील यांनी केले.
उद्घाटक बी. एस. कांबळे सर त्यांच्या भाषणात म्हणाले,” मराठी भाषा दिन औचित्य साधून अर्लीअन कवियोंका अध्यात्म ग्रुप समूहाने जो हा उपक्रम घेतला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे एक नवीन संदेश सगळीकडे रुजू झाला आणि अशी सुरुवात होत राहील. मराठी भाषेचा सन्मान करण्याची संधी मिळत राहील.
कवी संमेलन अध्यक्ष दिपक पवार सर यांनी सर्वांच्या काव्यवाचनावर अभिप्राय व्यक्त केले. शैलजा परमणे आणि दत्तात्रय गुरव हे प्रमुख अतिथी होते. स्मिता कुलकर्णी यांच्या काव्यवाचनाने काव्य संमेलनाची सुरुवात झाली.
निमंत्रित कवी दिपक पवार, सतीश भारतवासी, वीणा पाटील, अपूर्वा पाटील, वनिता पाटील, दत्तात्रय गुरव, स्मिता कुलकर्णी, बी.एस. कांबळे, सुधा जाधव, निशा खरात/शिंदे, सारिका पाटील, मनाली शेडबाळे, कविता शेट्ये, सुलोचना पाटील, रोहिणी अमोल पराडकर या सर्वांनी मराठी भाषेचा गौरव यावर कविता सादर केल्या.
ग्राफिक्सकार या पदावर कार्यरत असलेले अमोल पराडकर यांनी कार्यक्रमाचे चित्रिकरण केले. शेवटी उपवासाची खिचडी, राजगिरा लाडू आणि लस्सी याचा स्वाद घेत अभिजात मराठी भाषा यावर चर्चा केली. पुढील कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या.