नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानी हवाई दल लवकरच एक मोठा युद्ध सराव करणार आहे. यात UAE सह किमान 14 देश सहभागी होणार आहेत. पाकिस्तानी हवाई दल (PF) त्यांच्या एका ऑपरेशनल तळावर हा युद्ध सराव करत आहे. या सरावाला ‘इंडस शील्ड 2023’ असे नाव देण्यात आले आहे. चीन आणि सौदी अरेबियासह 14 देशांच्या हवाई दलाच्या तुकड्या यात सहभागी होत आहेत.


रविवारपासून सुरू झालेल्या या हवाई सरावात अझरबैजान, बहारीन, चीन, इजिप्त, जर्मनी, हंगेरी, इंडोनेशिया, इराण, इटली, कुवेत, मोरोक्को, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि उझबेकिस्तान हे देश सहभागी होत आहेत. “हा सराव पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या हवाई लढाऊ सरावांपैकी एक आहे असे साम टीव्हीने वृत्त दिले आहे.

पाकिस्तान हवाई दलाने रविवारी आपल्या अधिकृत ‘X’ खात्यावर सांगितले की, PAF चा 14 देशांचा हवाई लढाऊ सराव ‘इंडस शील्ड 2023’ हवाई दलाच्या DGPR हवाई तळावर जोरात सुरू आहे. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, ‘हा उच्च-स्तरीय युद्ध सराव पाकिस्तानच्या मेगा हवाई युद्ध सरावांपैकी एक आहे.


गेल्या महिन्यात पाकिस्तानी सैन्याने चीनसोबत मोठा सराव केला होता. चीन आणि पाकिस्तानने उत्तर-पश्चिम चीनमध्ये शाहीन-एक्स संयुक्त हवाई सराव यशस्वीरित्या पूर्ण केला. पाकिस्तान हवाई दलाच्या तुकडीतील J-10C आणि JF-17 लढाऊ विमाने चीनमधील संयुक्त हवाई सरावात यशस्वी सहभाग घेतल्यानंतर पाकिस्तानातील कार्यरत हवाई तळावर परत आले, असे पाकिस्तानी हवाई दलाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.