मुंबई (प्रतिनिधी) : ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत. युद्धविरामाच्या घोषणेनंतर अवघ्या तीन तासातच पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्नदेखील करण्यात आला. भारतीय लष्कराने मात्र पाकिस्तानचे सर्व मनसुबे उधळुन लावले असून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं पाकिस्तानने आता भलतेच मार्ग शोधून भारताविरोधात वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान आता सायबर आघाडीवर भारताला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं केंद्र सरकारने देशभरातली सायबर सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. कॉम्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन)ने सर्व सरकारी, आर्थिक आणि संवेदनशील क्षेत्रांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानकडून अनेक हॅकर गटपैकी एक असलेल्या पाकिस्तान सायबर फोर्स आणि एपीटी 36 सारखे हॅकर सोशल मिडिया, व्हॉट्सअॅप आणि ईमेलच्या माध्यमातून मालवेअर पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या बनावट लिंक्स आणि व्हायरस बँकिंग तपशील आणि इतर संवेदनशील माहिती चोरू शकतात. त्यामुळं कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी खात्री करा, असं अवाहन सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.

अशा फाइल्सवर क्लिक करू नका…

taskscheme.exe
operationSindoor.ppt
DanceofHilary.exe
IndianArmyReport.ppt
InsidesofWar.exe
operationsinSindu.pptx

नेमके काय कराल..?

अज्ञात लिंक्स आणि फाइल्स कधीही उघडू नका, फॅक्टर अॅथेंटिकेशन नेहमी चालू ठेवा, तुमचे पासवर्ड सुरक्षित आणि मजबूत ठेवा, मॉल्स किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय वापरणे टाळा, डिव्हाइसवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणे आवश्यक आहे, आधार, पॅन क्रमांकसह वैयक्तिक तपशील अनोळखी व्यक्तीस शेअर करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.