मोहोळ प्रतिनिधी :

एका व्यक्तीस वारंवार फोन करून तुम्ही काढलेले बँकेचे क्रेडिड कार्ड बंद कर, असे सांगत वारंवार त्याची माहिती विचारून घेऊन ऑनलाइन १ लाख ४४ हजार ९४९ रुपये काढून घेतले असल्याची घटना १२ ते १४ जानेवारी दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये लिपिक पदावर कार्यरत असणारे सुनील नारायण मस्के (रा. आण्णाभाऊ साठे नगर, मोहोळ) यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असून त्यांनी या खात्यावरून क्रेडिट कार्ड काढलेले आहे. १२ जानेवारी रोजी मस्के यांना एक एक निनावी फोन आला कि तुम्ही काढलेले क्रेडिड कार्डचे भाडे भरा. त्यानंतर १३ रोजी पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला व मस्के यांचेकडून क्रेडिड कार्डचा फोटो घेण्यात आला. १४  जानेवारी रोजी मस्के यांची पुन्हा वैयक्तिक माहिती घेत मस्के यांच्या मोबाईल नंबर वर आलेल्या ओटीपी क्रमांक मागून घेत तुमचे २४ तासात कार्ड बंद होईल असे सांगितले पुन्हा त्याच नंबर वरून फोन आला की तुमचे कार्ड बंद झाले नाही तुमचे पॅन कार्ड पाठवा तेव्हा मस्के आणि पॅन कार्ड चा फोटो पाठवला त्यावेळेस फिर्यादीच्या लक्षात आले की आपल्या क्रेडिट कार्ड वरून ५१ हजार ४१४ व पन्नास हजार ६४७ आणि २४००० रुपये एवढी रक्कम काढण्यात आली आहे. त्यामुळे सुनील नारायण मस्के यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात सदरच्या मोबाईल क्रमांकाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध १ लाख ४४ हजार ९४९ रुपये ऑनलाईन काढून घेऊन फसवणूक झाले असल्याची तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करत आहे.