कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : दिवाळी सणाचे औचित्य साधून शिवसेना सोशल मीडिया कोल्हापूरच्यावतीने आज कोल्हापूरातील एकटी संस्था संचलित बेघर निवारा केंद्र येथे दीपावली फराळ पॅकेट वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये केंद्रातील बेघर पुरुषांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदाचा क्षण सामायिक करण्यात आला.
दिवाळीचा प्रकाश केवळ घरापुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला. यावेळी निराधारांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच या दिवाळी उपक्रमाचे खरे यश असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
यावेळी सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जयवंत बर्गे, उपजिल्हाप्रमुख अमोल नवले, अक्षय घाटगे, पश्चिम महाराष्ट्र उपविभाग समन्वयक सौरभ कुलकर्णी, कागल तालुकाप्रमुख युवराज लाटकर, युवती सेना कोल्हापूर शहर प्रमुख शहरप्रमुख तेजस्विनी घाटगे, हातकणंगले तालुकाप्रमुख धैर्यशील माने, अभिषेक हेटकाळे, विक्रांत गवळी आदी उपस्थित होते.