कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका एमएच ०९- एफपी ही २ नोव्हेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका एमएच ०९- एफआर ही ३ नोव्हेंबर रोजी सुरु करण्यात येत आहे. यामुळे पसंती क्रमांकाचे अर्ज ३ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
डॉ. अल्वारिस म्हणाले की, एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येईल. अर्जदार आणइ प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल. अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले.