कोल्हापूर (प्रतिनिधी) : वारणानगर येथे ऊर्जांकुर सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये नवचंडी यज्ञ करण्यात आला. या नवचंडी यज्ञचे विधिवत पूजन आमदार डॉ. विनय कोरे, त्यांच्या पत्नी शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते झाले. उच्च, तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवचंडी यज्ञाचे दर्शन घेतले.

वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या मालकीचा ऊर्जाकुर सहवीज निर्मिती प्रकल्प झाला असून, त्यानिमित्त कारखाना कार्यस्थळावर नवचंडी यज्ञ व शेतकरी सभासदांसाठी भोजन आयोजित केले होते. वारणा साखर कारखान्याशी निगडीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आ. विनय कोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. १५ विविध प्रकारचे पदार्थ असलेल्या या सुरुची भोजनाचा वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सुमारे २५ हजार सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी आस्वाद घेतला.

यावेळी वारणा बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे, सुराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहा कोरे, वारणा बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जनसुराज्यचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, वारणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत, वारणा विविध उद्योग समूहातील व्हा. चेअरमन, सर्व आजी माजी संचालक, पदाधिकारी, शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सभासद, वारणा विविध उद्योग समूहातील कर्मचारी आदी उपस्थित होते.