कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक, शिक्षकेत्तर पुरस्कार २०२१-२२ करिता शहरस्तरीय निवड समितीची सभा नुकतीच  महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता महापालिका ५ शाळातील व खासगी अनुदानित ४ शाळातील मुख्याध्यापक,  सहा. शिक्षकांनी आपले प्रस्ताव कार्यालयाकडे सादर केले होते.  यातून गुणदानानुसार पडताळणी करून समितीने आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी यांची पुरस्काराकरिता निवड केली.

 

त्यांची नावे खालीलप्रमाणे : – 

आदर्श शिक्षक पुरस्कार (मनपा शाळा)

१ कविता रविकिरण सरदेसाई,  सहा. शिक्षिका,  लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग   विद्यामंदिर

२ स्वाती वसंतराव ढोबळे,  सहा. शिक्षिका,  लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर

३ सरिता प्रकाश सुतार,   सहा. शिक्षिका,  लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर

४ नेताजी आनंदा फराकटे,  सहा. शिक्षक,  लोणार वसाहत विद्यामंदिर

५  राजश्री सुनिल पोळ,  सहा. शिक्षिका ,  संत रोहिदास विद्यामंदिर

आदर्श शिक्षक पुरस्कार (खासगी अनुदानित शाळा)

१  उज्वला सुनिल जाधव,   मुख्याध्यापक,  डॉ. दिपक साळुंखे विद्यामंदिर

२  राजेंद्र तुकाराम कोरे,  सहा.शिक्षक,  श्री. सिध्देश्वर  प्रासादिक विद्यालय, विक्रमनगर

३ किरण श्रीरंग खटावकर  सहा. शिक्षक,  डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर

४  धनश्री दिगंबर जोशी,  सहा. शिक्षिका,  शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालय

विशेष शिक्षकेत्तर  पुरस्कार :-

१ अजय माधवराव गोसावी,  प्र. कनिष्ठ लिपिक,  प्राथमिक शिक्षण समिती, मनपा, कोल्हापूर कार्यालय

आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (मनपा शाळा)

१  रमेश आनंदराव पारखे,   सेवक,  मनपा संत रोहिदास विद्यामंदिर, सुभाषनगर

२  शिवाजी शंकर जाधव,  सेवक,   मनपा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर