मुंबई ( वृत्तसंस्था ) ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने डिसेंबर तिमाहीचे निकाल आज म्हणजेच शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात 12 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा 12.2 टक्क्यांनी वाढून 5,208 कोटी रुपये झाला आहे.


महसुलात 10 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन एका वर्षापूर्वीच्या 26.6 टक्क्यांवरून 26.3 टक्क्यांवर घसरले. त्याच वेळी, कंपनीचा नेटवर्क ऑपरेटिंग खर्च एक वर्षापूर्वी 7227 कोटी रुपयांवरून 7706 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च वर्षभरापूर्वी 16839 कोटी रुपयांवरून 18518 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.