मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळावा शिवाजी पार्कात होऊ नये यासाठी मिंधे गटाने केलेले प्रयत्न वाया गेले असून मिंधे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांचा मेळावा ओव्हल मैदानात होणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.


विरोधी गटावर निशाणा साधताना खासदार राऊत यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर, यांच्यासह अनेक नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी टीका करताना म्हटले की, ‘दिल्लीच्या मदतीने तुम्ही पक्ष, चिन्ह चोरलंत आता चोऱ्यामाऱ्या करायला तुमच्याकडे राहिलंय काय?’ मिंधे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावरही राऊत यांनी टीकास्त्र केली.

“कोण केसरकर ? केसरकरांचा शिवसेनेशी संबंध काय ? सावंतवाडीतील मोतील तलावावरील डोमकावळा आहे तो. पद, सत्तेसाठी आले होते. त्यांना आमचा विरोध होता, बाहेरच्या लोकांना मंत्रीपद देऊ नका ते पाठीत खंजीर खुपसून पळून जातील असं आम्ही म्हटलं होतं.