कुरुंदवाड प्रतिनिधी ( कुलदीप कुंभार ) धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हा समाज वर्षानुवर्षे संघर्ष करीत आहे, आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने अनेक आंदोलने केली आणि सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


या समाजाने मोठ्या प्रमाणात मेंढपाळ असलेल्या धनगर समाज बांधवांची आर्थिक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना लिहिलेल्या मागणी पत्राची प्रत त्यांनी शिरोळ तालुक्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला शनिवारी सुपूर्त केली.


आपण या कामी लवकरच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन धनगर समाज बांधवांच्या व्यथा आणि त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी मांडणार असल्याचं यावेळी शिष्टमंडळातील उपस्थित प्रतिनिधींना सांगितले,

यावेळी अमोल मरळे, शिवाजी बेडगे, बाचू बंडगर, राहुल बंडगर, संजय अनुसे, मल्लाप्पा धनगर, संतोष पडळकर, सुनील बंडगर, अमर पुजारी, रामभाऊ बंडगर, नवनाथ गावडे, तानाजी माने, बाळासो बंडगर, श्रावण गावडे, रामू पुजारी, तुकाराम चिगरे, दत्ता पुजारी, विजय फोंडे धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.