टोप (प्रतिनिधी) :  हातकणंगले तालुक्यातील खोची येथील एका बेपत्ता झालेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याची घटना आज (रविवार) उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या क्रुर घटनेमुळे खोची गाव आणि परिसरात नागरीकातून संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारपासून ही चिमुरडी बेपत्ता होती. तिचे वडील बांडगुळे कुटुंबासह सर्वत्र शोध घेत होते. सोशल मेडियावर याबाबतचा मेसेज व्हायरल करण्यात आला होता. दरम्यान, आज दुपारी चारच्या सुमारास मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानमध्ये एका झाडाखाली श्रावणीचा मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावर मारहाण केल्याचे वळ दिसत होते. तिच्यावर अत्याचार करुन गळा आवळून खुन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

त्यापैकी एका आरोपीला पेठवडगांव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहीती मिळतच अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, डीवायएसपी रामेश्वर वैंजाने यांचेसह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहेत.