मुरगूड (प्रतिनिधी) : कागल येथे ग्रामीण रुग्णालय येथे सुरु होत असलेल्या इंडोकाउंट कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेले अद्यावत मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक  भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशटाव गाडेकर, नवल बोते, डेप्युटी जनरल मॅनेजर अरुण गंगाधरण, इंडो काउंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतीश बुतडा, माजी उपनगराध्यक्ष नितीन दिडे, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, अमित पिष्टे, नवाज मुश्रीफ, अर्जुन नाईक, नेताजी मोटे, कर्नल विलास सुळकडे, विवेक लोटे आदी उपस्थित होते.