मुंबई ( प्रतिनिधी ) वस्त्रोद्योग क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांच्या उत्थानासाठी महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काळ मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यत: सहकारी सूतगिरण्यांनी वित्तीय संस्थांकडून तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून प्रतिचाती रु. 5 हजार प्रमाणे 5 वर्षांसाठी घेणाऱ्या मध्यम मुदती कर्जावर (दोन वर्षाच्या मोराटोरिअम कालावधीसह) कमाल 12 % पर्यंतचे व्याज प्रदान करण्याच्या योजनेस मान्यता देण्यात येणार आहे.

याबाबतचा शासननिर्णय राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

राज्यातील सहकारी सूतगिरण्या सुरळीत चालाव्यात तसेच आर्थिक अडचणीतून बाहेर याव्यात याकरीता कटिबद्ध असल्याचेही वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.