राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील आकनूर येथील सौ. प्रमिला प्रमोद सुतार (वय २६) या विवाहितेचा भाजल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी प्रमिला सुतार यांच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलीसात मुलीची सासू श्रीमती मंगल सुतार आणि पती प्रमोद सुतार यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत प्रमिलाची सासू आणि पती प्रमोद लग्नात मानपान केला नाही आणि मूल होत नसल्याच्या कारणावरून जाळून मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राधानगरी पोलिसांनी सासू आणि पतीवर गुन्हा नोंद केला आहे.