कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,१२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३७ जणांचा बळी गेला आहे. तर आज (शनिवार) दिवसभरात ७८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  ४,१६८ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २४२,  आजरा तालुक्यातील ४७, भुदरगड तालुक्यातील १९,  चंदगड तालुक्यातील ५५, गडहिंग्लज तालुक्यातील १०३,  गगनबावडा तालुक्यातील ४,  हातकणंगले तालुक्यातील ४०,  कागल तालुक्यातील २८,  करवीर तालुक्यातील १२५, पन्हाळा तालुक्यातील ८०,  राधानगरी तालुक्यातील १६,  शाहूवाडी तालुक्यातील ९३, शिरोळ तालुक्यातील १०३,  इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ७९ (इचलकरंजी ७०,जयसिंगपूर ५,गडहिंग्लज १,हुपरी ३) आणि इतर जिल्ह्यातील ८९ अशा १,१२३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ६९,०९८.

डिस्चार्ज – ५७,१३९.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ९,६६५.

मृत्यू -२,२९४.