मुंबई – अभिनेत्री तब्बू बॉलिवूड इंडस्ट्रीमधले नामवंत नाव आहे. तब्बूने १९ च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलं आहे. तब्बूने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तब्बूने बॉलिवूड सोबत तमिळ चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं आहे. तब्बूने त्यावेळच्या अनेक दिग्ग्ज अभिनेता आणि दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. पण तब्बू सोबत एका प्रसिद्ध अभिनेत्याने असं काही केलं की आज ही तब्बू त्यासोबत काम करत नाही.

काय झालं असं..?

खरं तर ही गोष्ट 1986 सालची आहे. जेव्हा जॅकी श्रॉफ फराह नाजसोबत ‘दिलजले’ चित्रपटात काम करत होते. त्यादरम्यान, ते अनेकदा त्यांच्या कोस्टार डॅनीच्या घरी एकत्र पार्टी करत असत. एके रात्री फराह जेव्हा तब्बूच्या पार्टीत पोहोचली तेव्हा तिथे असे काही घडले ज्याने सगळे थक्क झाले. जॅकीने पार्टीत खूप दारू प्यायली होती आणि दारूच्या नशेत तो तब्बूला जबरदस्ती किस करू लागला. मग कसेतरी डॅनीने जॅकीला हाताळले आणि तब्बूला दूर नेले.

त्या रात्री हे प्रकरण कसेबसे मिटले, पण दुसऱ्याच दिवशी त्यावरून मोठा गदारोळ झाला. जेव्हा फराहने मीडियामध्ये याबद्दल खळबळ उडवून दिली. ही बातमी समोर येताच संपूर्ण इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली. मात्र काही वेळाने तब्बू आणि फराहने हे प्रकरण संपवले आणि हा सर्व गैरसमज असल्याचे सांगितले. मात्र या घटनेनंतर तब्बूने कधीही जॅकीसोबत कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. फराहबद्दल बोलायचे झाले तर तिची कारकीर्द फार काळ टिकली नाही. आजकाल अभिनेत्री फार कमी सक्रिय आहे. तब्बू शेवटची अजय देवगणसोबत ‘भोला’ चित्रपटात दिसली होती.