कसबा बावडा ( प्रतिनिधी ) डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने संशोधनाचा वापर सर्वसामान्यासाठी व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. नव्याने सुरू होत असलेले ‘डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’ केंद्र वैज्ञानिक ज्ञान समाजापर्यंत पोहचविण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.

डी. वाय. पाटील गुपचे संस्थापक पद्मश्री आदरणीय डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये  ‘डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’चा शुभारंभ कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजने आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या संशोधनामुळे संस्थेच्या नावलौकीकात अधिकच भर पडली आहे.

नव्याने स्थापन झालेल्या ‘डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबीलीटी” च्या माध्यमातून हे संशोधन व विज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल.
रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रा. सी. डी. लोखंडे यांनी प्रास्तविकामध्ये गेल्या काही वर्षामध्ये विद्यापीठाने संशोधनामध्ये घेतलेली झेप व विभागाच्या इतर उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.

यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉ.  व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.  राकेश शर्मा,  उपकुलसचिव संजय जाधव, डॉ. मेघनाद जोशी, सिआयआर विभागाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संशोधक विदयार्थी उपस्थित होते.