कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. मागील चोवीस तासांत १६४० जणांना कोरोनाची लागण झाली असून २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३८२ तर करवीर तालुक्यात २७७ रुग्ण आढळून आले आहेत. आजअखेर पाच हजारांहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३८२, आजरा- ८५, भुदरगड- ३४, चंदगड- ११, गडहिंग्लज- २७, गगनबावडा – २, हातकणंगले – १९४, कागल- ६६,  करवीर- २७७, पन्हाळा- ११४, राधानगरी- ११२, शाहूवाडी – १२, शिरोळ – १४५, नगरपरिषद क्षेत्र- १४३, इतर जिल्हा व राज्यातील- ३६ अशा १६४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ७३, ०५० 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ५४, २६६ 

मृतांची संख्या – ५,००४

उपचार सुरु असलेले रूग्ण – १३, ७८०