कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ५४६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४१६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १७०२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ८.३० वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १४१, आजरा तालुक्यातील २, भूदरगड तालुक्यातील ६, चंदगड तालुक्यातील २०, गडहिंग्लज तालुक्यातील २५, गगनबावडा तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील ६९, कागल तालुक्यातील २०,  करवीर तालुक्यातील ९९, पन्हाळा तालुक्यातील २७, राधानगरी तालुक्यातील ८, शाहूवाडी तालुक्यातील २५, शिरोळ तालुक्यातील १८, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५६ आणि इतर जिल्ह्यातील २८ अशा एकूण ५४६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४१६ जण कोरोनामुक्त झालेतं.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील १, हातकणंगले तालुक्यातील ३, भुदरगड तालुक्यातील ३, इचलकरंजी परिसरातील जवाहर नगर येथील १ आणि निपाणी येथील १, सांगली जिल्ह्यातील १ अशा १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४२,९८३.    

एकूण डिस्चार्ज ३१,८८८.   

उपचारासाठी दाखल रुग्ण ९७३२.

तर एकूण मृत्यू १३६३ झाले आहेत.