कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात २४० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ३७७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९६० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज रात्री ८ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार, गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ७२, आजरा तालुक्यातील १,भूदरगड तालुक्यातील १४,चंदगड तालुक्यातील १२, गडहिंग्लज तालुक्यातील ६, हातकणंगले तालुक्यातील २२, कागल तालुक्यातील १०, करवीर तालुक्यातील ४६, पन्हाळा तालुक्यातील ४, राधानगरी तालुक्यातील ३, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३३ आणि इतर जिल्ह्यातील १४ अशा एकूण २४० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३७७ जण कोरोनामुक्त झालेतं.
दरम्यान, करवीर तालुक्यातील वळिवडे येथील १, हातकणंगले तालुक्यातील ३, शिरोळ तालुक्यातील १, कागल तालुक्यातील २, इचलकरंजी १,चंदगड तालुक्यातील १ पन्हाळ्यातील १ अशा तब्बल १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४५,५९५.
एकूण डिस्चार्ज ३५,६०३.
सध्या उपचारासाठी दाखल रुग्ण ८,५०३.
आजअखेर एकूण मृत्यू १४८९ झाले आहेत.