मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कालच लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय प्रचाराला वेग येऊ लागला आहे. या प्रचारांमध्ये विरोधक आक्रमक भूमिका देखील मांडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काल अमरावतीत शरद पवार विखे पाटलांना टोला लगावला आहे. मी काही अहमदनगरमधून निवडणूक अर्ज भरलेला नाही. उगीच स्वतःच महत्व वाढवण्यासाठी दुसऱ्याचे नाव घेणं हे काही शहाणपणाचे लक्षण नाही, असा टोला शरद पवार यांनी विखे-पाटलांना लगावला. अहमदनगरमध्ये मविआ विरुद्ध महायुती अशी न राहता विखे विरुद्ध पवार अशी असल्याचे चित्र रंगवले जात असल्याबाबत शरद पवारांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले. काल अमरावतीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अमित शाह यांच्यावर सुद्धा साधला निशाणा

अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अमित शहा यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मागील दहा वर्षात शरद पवारांनी काय केलं असा प्रश्न मला विचारला जातो. मी तर सत्तेत नव्हतो, तुम्ही सत्तेत होता तुम्ही काय केलं हे सांगितले पाहिजे, असं सांगत त्या आधी मी सत्तेत असताना मी काय केलं आहे हे सर्व जनतेला माहीत असल्याचं शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला साडेत्तोर उत्तर दिले आहे

गृहमंत्री अमित शाह यांची शरद पवार याना टीका

माजी कृषिमंत्री सत्तेत होते तरी महाराष्ट्राचा विकास करू शकले नाहीत पण मोदींनी १० वर्षात खूप विकास कामे केलं आहेत अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी माजी कृषिमंत्री शरद पवारांवर केली होती.