कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशाचे लक्ष लागून राहिलेली बिहार विधानसभा निवडणूक आणि अन्य राज्यांतील पोटनिवडणुकीचे अंतिम निकाल आज (बुधवार) पहाटे जाहीर झाले. पोटनिवडणुकीत गुजरात, मध्य-प्रदेश, कर्नाटक, मणिपूर,  तेलंगणा या राज्यांत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला. बिहार राज्यात ७४ जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. याबद्दल आज बिंदू चौकात कोल्हापूर भाजपतर्फे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

कार्यकर्त्यांनी ‘देश का नेता कैसा हो… नरेंद्र मोदी जैसा हो, भारत माता की जय’ अशा घोषणा देत आणि हलगीच्या तालावर ठेका धरत विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी सरचिटणीस विजय जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई,  सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, विजय अग्रवाल, चिटणीस प्रदीप उलपे, सुनील चव्हाण, दिग्विजय कालेकर, नगरसेवक विजय खाडे, मंडल अध्यक्ष संतोष माळी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.