इस्रायल ( वृत्तसंस्था ) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने दहशतवाद्यांच्या हल्ल्याची पुष्टी केली आहे. पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी शनिवारी पहाटे गाझा पट्टीतून इस्रायलवर डझनभर रॉकेट डागले, त्यानंतर काही तासांत घुसखोरी झाल्याची बातमी आली समोर आली आहे.

हमासने सांगितले की त्याच्या लष्करी शाखेचे प्रमुख मोहम्मद डेफ यांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक महत्त्वाची घोषणा करण्याची योजना आखली आहे. डीफने रेकॉर्ड केलेला संदेश जारी केला आणि त्याला ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म असे नाव देण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार 5,000 रॉकेटद्वारे शत्रूची ठिकाणे, विमानतळ आणि इतर लष्करी तळ यांना लक्ष करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी हमासने स्वीकारली आहे. इस्रायली लष्कराने सांगितले की, गाझा पट्टीतून मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी अतिरेकी इस्रायलमध्ये आले आहेत आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी ९ वाजता केला हल्ला..!


गाझाजवळ राहणाऱ्या इस्रायलींना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, रॉकेटमुळे इस्रायलच्या अनेक भागात सायरन वाजले. भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी ९ वाजता हा हल्ला सुरू झाला. स्थानिक वेळ 6.30 वाजली होती आणि यावेळी बहुतेक इस्रायली झोपले होते. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेल अवीवमधील संरक्षण दलाच्या मुख्यालयात सुरक्षेचे मूल्यांकन करत आहेत.


‘हमास’ला मोठी कींमत मोजावी लागेल..!

या हल्ल्यानंतर इस्रायलकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हमास या दहशतवादी संघटनेने तासाभरापूर्वी हल्ला केला. त्यांनी रॉकेट डागले आणि इस्रायलच्या हद्दीत घुसखोरी केली. इस्रायलचे संरक्षण दल नागरिकांचे रक्षण करणार असून हमास या दहशतवादी संघटनेला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. गाझा पट्टीतील दहशतवाद्यांना लक्ष्य करत युद्धासाठी सज्ज असल्याचे लष्कराने म्हटले आहे.