शिरोळ ( प्रतिनिधी ) : शिरोळ येथील गोविंदा पथकांच्या तरुणांची नागपंचमी सणापासून कसून सराव मंडळाच्या मैदानावरती सुरू असून येथील अजिंक्यतारा मंडळ, गोडी विहीर तालीम मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, हनुमान तालीम मंडळ, एस,पी,बॉईज, विजयसिंह गोविंदा पथक, तसेच कुटवाड येथील नरसिंह गोविंदा पथक या तरुण मंडळांनी दहीहंडी क्षेत्रामध्ये कोल्हापूर शहरातील नामांकित दहीहंडी बरोबर सांगली, इचलकरंजी , मिरज ,शहरातील मानाच्या लाखोंच्या दहीहंडीचे मानकरी ठरले आहेत
यावर्षीही कोल्हापूर सांगलीसह प्रमुख शहरातील लाखोंच्या नामांकित दहीहंडी फोडण्यासाठी तयारी केली असल्याचे गोविंदा पथकाकडून सांगण्यात येत आहे. राज्य शासनाकडून मागील वर्षी गोविंदासाठी सुरक्षा म्हणून गोविंदा मंडळातील सहभागी तरुणांना विमा कवच दिले होते मात्र यावर्षी राज्य शासनाकडून गोविंदा पथकांना विमा कवच अद्याप दिलेले नाही गोविंदा पथकातील तरुणांना सुरक्षा म्हणून विमा कवच देण्याची गरज असल्याचे याची गोविंदा पथकाकडून मागणी होत आहे