राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडेत यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्तपणे साजरा होत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. राशिवडेमध्ये पंचवीससहून अधिक सार्वजनिक मंडळांनी गणेशांच्या मुर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. या श्री मुर्तींचे विसर्जन ६ सप्टेंबर रोजी होत आहे. या मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

तर यावेळी दुबई येथील पतु डान्सग्रुप, रिच हायपर ड्राईव्ह ऑडिओ,  गुजरात येथील डान्सग्रुप, तर आकर्षक लाईट शो मिरवणुकीचे खास आकर्षण असणार आहे. दुपारी १ वाजता या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. यामध्ये पारंपारिक वाद्यांसह लोकसंस्कृती दाखवणारी नृत्य पथके, मुंबई, पुणे येथील डान्सग्रुप मिरवणुकीमध्ये खास आकर्षण असणार आहे.

या मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. शासनाने घालून दिलेल्या आवाजा मर्यादेच्या पातळीच अथवा नियमांचे उल्लंघन झाल्यास मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी तीन पोलीस निरीक्षक, तीस पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केल्याचे पोलीस निरीक्षक आप्पासो कोळी यांनी सांगितले.