सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवा उद्योजकांना घडविण्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचे आधुनिक उद्योग प्रोद्योगिक केंद्र या जिल्ह्यात म्हणजे सिंधुदुर्गमध्ये होत आहे. या प्रशिक्षण केंद्रावर 165.28 कोटी भारत सरकार खर्च करणार आहे. या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 11 मार्च रोजी होणार आहे. अशी माहिती एमएसएमई मंत्रालयाचे नागपूर येथील संचालक पी. एम. पार्लेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या केंद्रामुळे दहा हजार युवक-युवतीना प्रशिक्षनाची संधी मिळणार आहे. यातून कोकणातील उद्योजकाना संधी मिळणार आहे. रोजगार स्वयंरोजगारची संधी तसेच या भागातील कौशल्याचा विकास होईल व रोजगाराची मोठी संधी मिळेल, असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केला. हे केंद्र नारायण राणे यांच्या मुळेच मंजूर झाल्याने देशातील 700 जिल्ह्यामध्ये 20 केंद्रातील या जिल्ह्यात एक केंद्र होत असल्याबद्दल मनिष दळवी यांनी नारायण राणे यांचे आभार मानले.

या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, एमएसएमईचे सहाय्यक संचालक राहुलकुमार मिश्रा, सुप्रिया वालावलकर उपस्थित होते.