कोल्हापूर (प्रतिनिधी) : पीएम किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक असून यासाठी ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले.

पी. एम. किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-केवायसी प्रमाणीकरणाचे काम सध्या सुरु असून यासाठी लाभार्थ्यांची आधारकार्ड जोडणी करुन घेतली जाणार आहे. लाभार्थ्यांनी ‘आपले सरकार’ केंद्रांमार्फत अथवा पीएम किसान अॅपद्वारे ई-केवायसी प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.