मुंबई (प्रतिनिधी) : चीत झाले तरी आमचं बोट वर आहे, अशी आमच्या जुन्या मित्रांची सवय आहे. मॅन ऑफ द मॅच, सीरिज, नरेंद्र मोदी आणि भाजपच आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचे डिपॉझिट वाचले नाही, नोटापेक्षाही कमी मते मिळाली. शिवसेनेने याचे आत्मचिंतन केले पाहिजे. जोरदार यादीपण घोषित केली होती, पण काय अवस्था झाली हे पाहिले आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

बिहार निवडणूक निकालावरुन संजय राऊत यांनी अभिनंदन करत केलेल्या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी निकाल काहीही असला तरी तेजस्वी यादव ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरल्याचे म्हटले होते. यावर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

फडणवीस म्हणाले की, नैतिकता सोडून ज्यावेळी युती करता तेव्हा जनता उत्तर देत असते.  सरकारचे अपयश लपवा हेच त्यांचे काम आहे. डिफेन्सच्या फळीत ते अग्रकमावर आहेत. आणि मग ज्यावेळी लॉजिक नसते तेव्हा काहीतरी सांगून सरकारचे अपयश लपवत असतात.