साळवण (प्रतिनिधी) : पंचायत समिती गगनबावडा येथे कृषी दिनानिमित्त गटविकास अधिकारी माधुरी परीट यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मंडल अधिकारी गजानन खाडे यांनी प्रास्ताविक केले.

कृषी अधिकारी दाभाडे (गगनबावडा) यांनी पंचायत समितीमार्फत केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी रा. बी. सावंत यांनी कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. गटविकास अधिकारी माधुरी परीट यांनी कृषी विभागाचे सध्याच्या काळात असणारे महत्त्व विषद करून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. तालुक्यातील अनेक शेतकरी व खते बी-बियाणे विक्री दुकानदार उपस्थित होते. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी शिवाजी गायकवाड यांनी केले. पराग परीट यांनी आभार मनले.