हातकणंगले (प्रतिनिधी) : माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर फौडेंशन आणि युवाशक्ती मिणचे यांच्यातर्फे सुरु केलेल्या मोफत कोव्हिड सेंटर वडगांव परिसरासह हातकणंगले तालुक्यातील जनतेसाठी नक्कीच उपयोगी पडेल. बेड अभावी सर्वसामान्य जनतेची होणारी हेळसांड थांबेल. असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला. ते हातकणंगले तालुक्यातील मिणचे येथे कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

यावेळी आ. विनय कोरे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला एकाच स्वच्छतागृहांच्या वापरामुळे घरी विलगीकरण करणे अवघड जाते. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढण्याचा धोका मोठा आहे. त्यामुळे डॉ. सुजित मिणचेकर फौडेंशनच्या वतीने सुरु केलेले मोफत कोव्हिड केअर सेंटर हातकणंगले तालुक्यातील जनतेला नक्कीच उपयोगी पडणार असल्याचे सांगितले.

यावेळी जि.प. शिक्षण व अर्थ समितीचे सभापती प्रवीण यादव,  सचिव संजय चौगुले, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुहास कोरे, वडगाव नगराध्यक्ष मोहनलाल माळी, राजेश पाटील, अरविंद खोत, दीपक पाटील, आप्पासाहेब मोहिते आदी उपस्थित होते.