मुंबई (प्रतिनिधी) :  तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत तब्बल २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा सिलेंडर ८८४.५ रुपयांना मिळणार आहे. एवढेच नाही तर १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत, त्याची किंमत प्रति सिलेंडर ७५ रुपयांनी वाढवली आहे.

यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. १ जुलै रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमती१९०.५० रुपयांनी वाढल्या आहेत. तर डिसेंबरपासून आतापर्यंत सिलिंडरच्या किंमतीत सुमारे ३०० रुपयांची वाढ झाली आहे.

तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडर देखील ७५ रुपयांनी महाग झाले आहे. १७ ऑगस्ट रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतही ६८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता १६१८ रुपयांऐवजी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी १६९३ रुपये मोजावे लागणार आहेत.