कागल (प्रतिनिधी) : कागल शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नागरिकांना दोन हजार ध्वजांचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, केडीसीचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, राष्ट्रवादीचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी, सुनील माने, सौरभ पाटील, शशिकांत नाईक, आनंदा परीट, भरत निंबाळकर आदी प्रमुख उपस्थित होते.