सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि सिंधू रत्नयोजना यांच्यावतीने सिंधू रत्न समृद्ध योजना शेतकरी मेळावा आणि लाभार्थ्यांना विविध लाभ वाटप कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री तथा सिंदूरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले येथे झाला. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेत सिंधु रत्न योजनेचे सदस्य माजी आमदार प्रमोद जठार, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत व अजित यशवंतराव हे तीनही सदस्यांची नावे असताना गैरहजर होते. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

यातील प्रमोद जठार हे भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख तर किरण सामंत शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. त्यामुळे ते दोघे गैरजर असल्याने याची मात्र चर्चा कार्यक्रमस्थळी जोरदार सुरू होती. तर शासकीय कार्यक्रम सकाळी 11 वाजता होता. मात्र मंत्री महोदय हे 1.30 वाजता नियोजित कार्यक्रमासाठी दाखल झाले.त्यामुळे तब्बल अडीच तास शेतकरी व लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागली.

या कार्यक्रमात घाई गडबड एवढी होती की आयोजकांनी लाभार्थ्यांचे चेक कोणते ही नाव न लिहीता कोरे चेक मंत्री महोदयांच्या हस्ते वाटप केले