गांधीनगर (प्रतिनिधी) : कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने तावडे हॉटेलनजीक पुणे-बेंगलोर महामार्गावर कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेला सुरक्षा कठडा तोडून खाली गेला. हा प्रकार आज (बुधवारी) सकाळी ११:३०च्या दरम्यान झाला. मात्र यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

हा कंटेनर क्र (एन एल क्यू ०३४४) कागलच्या दिशेने जात होता. कंटेनर वेगात असल्याने चालकाचा त्यावरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेला कठडा तोडून खाली गेला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. पण कंटेनरचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच गांधीनगर पोलीस घटनास्थळी आले. काही काळ वाहतुकीत अडसर निर्माण झाला. पोलीस हवालदार गजानन कुराडे, शशिकांत जाधवर यांनी वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.