बेळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत भाजपच्या दुसऱ्या यादीची घोषणा झाली आहे. अनेक शक्यतांचा पार्श्वभूमीवर बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत कर्नाटक भाजपच्या घाणेरड्या राजकारणाची चर्चा इंटरनेटवर जोरदार सुरू झाली आहे.

कन्नड माध्यमांनी बेळगावच्या उमेदवारपदी भाजप हा पक्ष काँग्रेसमधून आयात करण्यात आलेल्या उमेदवाराची वर्णी लावणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावरून भाजपच्या गोटात हलकल्लोळ माजला असून सद्या तरी बेळगावात स्थानिक नेत्यात कोणी लायक नाही का ? असा प्रश्न गांभीर्याने उपस्थित केला जात आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात राज्य भाजपने लिंगायत उमेदवार द्यावा असा आग्रह धरला आहे. यासाठी प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव पुढे केले जात आहे. बेळगावातील प्रखर हिंदुत्ववादी भाजप निष्ठ नेत्यांना बाजूला सारण्याचे राजकारण सुरू आहे. या निमित्ताने भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांना नेमका भाजपचा विजय अपेक्षित आहे की प्रतिस्पर्धी पक्षांचा? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करीत आहेत.

स्थानिकांपैकी माजी आमदार संजय पाटील आणि इतर इच्छुकांच्या अर्जाला वाटाण्याच्या अक्षता लावून भाजप नेते विरोधी पक्षातील लिंगायत धर्म पाळत आहेत का ? असा खुद्द भाजप कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. जगदीश शेट्टर हे बेळगावचे नाहीत. यामुळे लिंगायत असले तरी त्यांना लिंगायत लोकही मतदान करणार नाहीत. हे चित्र आहे. मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. रवी पाटील यांच्या रूपाने याचे उत्तर आले आहे. याचा विचार करून निर्णय घेतला जावा असे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

केंद्रीय नेतृत्वाने कर्नाटकात चाललेल्या लिंगायत अडजस्टमेंट राजकारणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. जातीचे राजकारण आपल्या जातीतील इतरांसाठी करून स्थानिक निष्ठावंत नेत्यांना कुजवण्याचे षडयंत्र कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपच्या विरोधात उभे राहून नुकसान केलेल्या अनेकांना आयात करून स्थानिक कार्यकर्त्यांची ऊर्जा कमी केली जात असल्याचे दिसून येत आहे. या राजकारणाने भाजपचे प्रचंड मोठे नुकसान होत असून निष्ठेची झाली चेष्टा अशाप्रकारची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

भाजपच्या विरोधात उभे राहून नुकसान केलेल्या अनेकांना आयात करून स्थानिक कार्यकर्त्यांची ऊर्जा कमी केली जात असल्याचे दिसून येत आहे. या राजकारणाने भाजपचे प्रचंड मोठे नुकसान होत असून निष्ठेची झाली चेष्टा अशाप्रकारची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.