उचगाव ( प्रतिनिधी ) : अत्यंत गरीब परिस्थितीत आश्विनी गोविंद मुदुगडे या मुलगीने बीएचएमएस ही डॉक्टरकीची पदवी मिळविल्या बदल तिचा ग्रामस्थांच्या वतीने व एन. डी. ग्रुपच्या वतीने हनुमान पाणी पुरवठा संस्थेचे व्हा. चेअरमन विकास मौर्य यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तिने ही पदवी साडेचार वर्षामध्ये पूर्ण करून दैदिप्यमान यश संपादन केले. त्यानंतर तिने एक वर्षाची इंर्टन्सशीपही पूर्ण केली आहे. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.यशामध्ये आई वर्षा वडील गोविंद याचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे तिने सत्कार प्रसंगी सांगितले.
याप्रसंगी दशरथ चौगले, गुणपाल मसुटे धनपाल संकपाळ, बबन कदम, बाळाहेब निगडे, महादेव चव्हाण, नामदेव वाईंगडे ( एन.डी.) संजय वतनदार, आनंद गजबर, श्रीकांत दळवी, आनंदा माळी, शशिकांत पाटील, उदय पाटील, महिपती यादव संदिप वळकुंजे, सचिन यादव, निवास यादव, जयसिंग वळकुंजे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.