कळे (प्रतिनिधी) : शेतकरी संघटनांकडून मागील वर्षीचे चारशे रुपये व यावर्षीच्या ऊस दरासाठी तीव्र आंदोलन होत आहे. याच पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव आणि कळे येथे शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले.


या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दालमिया शुगर, कुंभी कासारी कारखाना, डी.वाय पाटील साखर, अथनी शुगर या कारखान्यांच्या विरोधात शरद जोशी शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत काटेभोगाव आणि कळे येथील कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कांहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी कळे पोलीसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


यावेळी शरद जोशी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक जाधव, बाजीराव देवाळकर, धोंडीराम चौगले, बबन खाटांगळेकर, सरदार पाटील, शिवाजी खाडे, सरदार आंग्रे, शंकर कांबळे, विठ्ठल पवार, दीपक पवार, विजय मगदूम, कृष्णात मगदूम आदी उपस्थित होते.