मंथन शिबिरात राष्ट्रवादीचा मिशन १०० चा नारा

शिर्डी (प्रतिनिधी) :येथे झालेल्या दोन दिवसीय मंथन शिबिरात राष्ट्रवादीने मिशन १०० चा नारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या या नाऱ्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीने १०० जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. मग महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट किती जागा लढवणार? अशी चर्चा आता या निमित्ताने रंगू लागली आहे. राष्ट्रवादीचे… Continue reading मंथन शिबिरात राष्ट्रवादीचा मिशन १०० चा नारा

शिर्डी येथे ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ शिबिर सुरु

शिर्डी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ हे शिबिर आजपासून शिर्डी येथे सुरु झाले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षाची वाटचाल कशा पद्धतीने करावी याबद्दल अनेक मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रथेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल… Continue reading शिर्डी येथे ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ शिबिर सुरु

फडणवीस दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

पंढरपूर (प्रतिनिधी) : कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे श्रीविठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. आधी मला आषाढी एकादशी, आता कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान मिळाला हे माझे भाग्य आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या. कार्तिकी वारी यात्रेच्या शासकीय महापूजेनिमित्त गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस पंढरीत आले होते. आज पहाटे… Continue reading फडणवीस दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

चंद्रपुरात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा

चंद्रपूर (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा बेबीताई उईके यांनी आपला प्रदेशाध्यक्षाकडे राजीनामा पाठविल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला c राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मागील सहा महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौरा झाला असून, पक्षवाढीसाठी… Continue reading चंद्रपुरात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा

आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही : बच्चू कडू

अमरावती (वृत्तसंस्था) : ‘ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो; पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही’, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी आ. रवी राणा यांना दिला. तसेच राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा विषय माझ्यासाठीही संपला असल्याचे ते म्हणाले. रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर… Continue reading आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही : बच्चू कडू

मोरबी पूल दुर्घटना प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक

मोरबी : गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एक झुलता पूल कोसळून १४० जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मोरबी येथे मच्छू नदीवरील केबल पूल कोसळल्याच्या घटनेनंतर आता पुलाची डागडुजी करणाऱ्या ओरेवा या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बेपत्ता आहेत. गुजरात ब्रिज दुर्घटनेनंतर विरोधकांनी पंतप्रधानांवर… Continue reading मोरबी पूल दुर्घटना प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक

बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष बियाणी यांची आत्महत्या

बीड : भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. बियाणी यांच्या आत्महत्येची बातमी समजताच खासदार प्रीतम मुंडे यांनी तत्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही रुग्णालयात गेले होते. या अचानक घडलेल्या घटनेने साऱ्यांनाच मोठा धक्का… Continue reading बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष बियाणी यांची आत्महत्या

दोघांच्या भांडणात अनेक वर्षांची पुण्याई गोठवली : खडसे

जळगाव : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवले ते एका मिनिटामध्ये मुलांनी गमावले, अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सद्यस्थिती आणि पक्षाचे नाव, चिन्ह गोठवल्यानंतर खडसे यांनी ही टीका केली. ते आज जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात… Continue reading दोघांच्या भांडणात अनेक वर्षांची पुण्याई गोठवली : खडसे

वणी गडावर जाणाऱ्या लालपरीला आग, जीवितहानी नाही

नाशिक : नाशिकमध्ये आणखी एका बसला आग लागली. एसटी महामंडळाच्या बसला आग लागली असून, ही बस वणीकडे जात होती. आज पहाटेच नाशिक-औरंगाबाद महामार्गावर खासगी ट्रव्हल्सला आग लागून १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर ३८ प्रवाशी जखमी आहेत. यानंतर आज पुन्हा वणीच्या मार्गावर असताना लालपरीला आग लागली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.… Continue reading वणी गडावर जाणाऱ्या लालपरीला आग, जीवितहानी नाही

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर बस पेटल्याने १३ प्रवाशांचा मृत्यू

नाशिक : नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर नांदूरनाका या ठिकाणी शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी लहान बाळासह दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा १३ वर गेला आहे. खासगी बसच्या अपघातात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, ३८ प्रवासी जखमी… Continue reading नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर बस पेटल्याने १३ प्रवाशांचा मृत्यू

error: Content is protected !!