भाजपला शिवसेनेचे तुकडे करायचेत : प्रकाश आंबेडकर

अकोला (वृत्तसंस्था) : काँग्रेसने आतापर्यंत एका ‘आरपीआय’च्या १० ‘आरपीआय’ केल्या. भाजपलाही एका शिवसेनेच्या १० शिवसेना करायच्या आहेत. त्या होऊ द्यायच्या का नाहीत, हे उद्धव ठाकरे यांच्याच हातात आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांना स्पेस न देता त्यांना सर्व निवडणुका लढवाव्या लागतील, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत… Continue reading भाजपला शिवसेनेचे तुकडे करायचेत : प्रकाश आंबेडकर

तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात

तुळजापूर : श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत पूजा व आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीच्या पालखीचा विसावा घेऊन पुन्हा आरती करण्यात आली. मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार, आई… Continue reading तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात

मी कोणासमोरही झुकणार नाही : पंकजा मुंडे

बीड : (वृत्तसंस्था) : ‘संघर्ष माझ्या रक्तात आहे आणि तो मी करत राहणार, थांबणार नाही, मी संघर्षाला घाबरत नाही. मी वचनाला मुकणार नाही, थकणार नाही, मी कोणासमोरही झुकणार नाही. मी कोणत्याही आगीतून नारळ बाहेर काढायला घाबरत नाही. असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. भगवान गडावर आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.… Continue reading मी कोणासमोरही झुकणार नाही : पंकजा मुंडे

लोकसंख्येचे सर्वसमावेशक धोरण सर्वांना लागू व्हावे : मोहन भागवत

नागपूर : देशात लोकसंख्येचे योग्य संतुलन आवश्यक आहे. आपल्या देशाचे पर्यावरण किती लोकांचे पालनपोषण करू शकते, किती लोकांना ते सांभाळू शकते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. लोकसंख्येचे सर्वसमावेशक धोरण असावे आणि ते सर्वांनाच लागू व्हावे. त्या धोरणातून कोणालाही सवलत देता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले. यावेळी महिला… Continue reading लोकसंख्येचे सर्वसमावेशक धोरण सर्वांना लागू व्हावे : मोहन भागवत

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात १० गिर्यारोहकांचा मृत्यू

उत्तराखंड (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधील द्रौपदीच्या दांडा-२ पर्वताच्या शिखराजवळ हिमस्खलन होऊन १० गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून, ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. पुष्कर सिंह धामी यांनी गिर्यारोहकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे हवाई दलाची मदत मागितली आहे. ‘आएएफ’ने बचाव आणि मदत कार्यासाठी २ चित्ता हेलिकॉप्टर… Continue reading उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात १० गिर्यारोहकांचा मृत्यू

अजित पवार यांचा मिश्किल टोला, फडणवीसांची कोपरखळी

नागपूर (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अजितदादांनी प्रशिक्षण कधी मिळेल, अशी विचारणा फडणवीसांना केली, तर फडणवीस यांनीही ऑनलाईन प्रशिक्षण करू, अशी कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आल्यामुळे अजितदादांनी आपल्या शैलीत टीका करत फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेणार, असा टोला… Continue reading अजित पवार यांचा मिश्किल टोला, फडणवीसांची कोपरखळी

तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव मंगलमय वातावरणात सुरु

तुळजापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून मंगलमय वातावरणात सुरु झाला आहे. दोन वर्षांनंतर कोरोनाचे निर्बंध हटल्याने उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या आधी मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाली आहे. यावेळी आई तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला. पहाटे… Continue reading तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव मंगलमय वातावरणात सुरु

कॉ. पानसरे यांच्या शहीद दिनी काढणार मूक मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॉम्रेड शहीद गोविंद पानसरे यांच्या शहीद दिनानिमित्त (२० फेब्रुवारी) सरकारला जाग आणण्यासाठी व मारेकरी आणि सूत्रधार यांच्यावर कारवाई होण्यासाठी महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून मूक मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन अमरावती येथे उत्साहात पार पडले. या तीन दिवसीय राज्य अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यातून ७ महिलांसह ३७ प्रतिनिधीनींनी… Continue reading कॉ. पानसरे यांच्या शहीद दिनी काढणार मूक मोर्चा

संघाच्या दसरा सोहळ्यात महिला गिर्यारोहक प्रमुख पाहुण्या

नागपूर (वृत्तसंस्था) : दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी नागपुरात संघ मुख्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्यात संतोष यादव यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. संघाच्या दसरा कार्यक्रमात एखादी महिला ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संघटनेच्या बैठकीत महिलांचा सहभाग तुलनेने कमी असल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. या दरम्यान,… Continue reading संघाच्या दसरा सोहळ्यात महिला गिर्यारोहक प्रमुख पाहुण्या

गुंतवणुकीवर महाविकास आघाडीचे नेते उदासीन : मुनंगटीवार

नागपूर (प्रतिनिधी) : राज्यातील गुंतवणुकीवर महाविकास आघाडीचे नेते उदासीन होते, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केली आहे. आघाडीच्या काळात असे उद्योग राज्याबाहेर गेले तेव्हा आम्ही राजकारण केले नाही, असेही मुनंगटीवार म्हणाले. माध्यमांशी बोलताना मुनंगटीवार म्हणाले की, फॉक्सकॉनबद्दल विरोधकांचे आरोप तर्कशून्य आहे. काँग्रेस नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनो महाराष्ट्रात येणार होता, तो प्रकल्प… Continue reading गुंतवणुकीवर महाविकास आघाडीचे नेते उदासीन : मुनंगटीवार

error: Content is protected !!