कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात १५ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सलग आज दुसऱ्या दिवशी मृत्यूचा आकडा शून्यावर पोहचला. दिवसभरात २१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४३८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा.… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात १५ जणांना लागण

गुड न्यूज : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभराहून कमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. बऱ्याच महिन्यांनंतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शंभराहून कमी म्हणजे ९४ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ पर्यंत चोवीस तासात २० जणांचे कोरोना चाचणी अहवाल… Continue reading गुड न्यूज : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभराहून कमी

दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका २१ पासून : डॉ. स्टीव्हन अल्वारिस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FR दि. १८ डिसेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-FS  दि. २१ डिसेंबर रोजी सुरु करण्यात येत आहे. इच्छुक वाहनधारकांनी पसंती क्रमांकाचे अर्ज २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ ते २ या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन… Continue reading दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका २१ पासून : डॉ. स्टीव्हन अल्वारिस

एनसीबीकडून पुन्हा एकदा अर्जुन राजपालला समन्स

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्म्हत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरण समोर आहे. यामध्ये अनेक अभिनेता- अभिनेत्रींना एनसीबीकडून समन्स देण्यात आले होते. आता एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल यांना पुन्हा समन्स बजावले आहे. अर्जुन रामपाल आता १६ डिसेंबरला एनसीबीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. मागील चौकशीनंतर एनसीबी कार्यालय सोडल्यानंतर अर्जुन रामपाल १३ नोव्हेंबर रोजी कोणत्याही निष्पाप… Continue reading एनसीबीकडून पुन्हा एकदा अर्जुन राजपालला समन्स

राष्ट्रवादीची डिजिटल रॅली चंदगडपर्यंत पोचली हेच आपलं यश… : शरद पवार

चंदगड (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये अनेकांनी पवार यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार राजेश पाटील यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. राष्ट्रवादीची डिजिटल रॅली चंदगडपर्यंत पोचली हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आपल्या राष्ट्रवादीचे टीमचे यश आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले. आ.… Continue reading राष्ट्रवादीची डिजिटल रॅली चंदगडपर्यंत पोचली हेच आपलं यश… : शरद पवार

कोल्हापुरातील ‘या’ गावात बोकडाची दहशत..(व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मागील काही दिवसांपासून गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड गावात एका बोकडाचे दहशत माजवली आहे. गावात रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना तसेच मोटारसायकल चालवणाऱ्यांना हे बोकड मागून धडक मारत असल्याच्या घटना घडत आहेत.त्यामुळे या बोकडापासून सावधान रहा, असे फलक गावातल्या चौकात लावण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मी देवाचा बोकड गावातील लोकांनानाहक त्रास देत आहे. गाडीचालक दिसला की तो… Continue reading कोल्हापुरातील ‘या’ गावात बोकडाची दहशत..(व्हिडिओ)

श्री अंबाबाई, जोतिबासह मुख्य मंदिरांतील दर्शन वेळ वाढल्याने भाविकांत समाधान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री जोतिबा, दत्त भिक्षालिंगसह सर्व मंदिरांतील दर्शन वेळेत पुन्हा वाढ करण्यात आल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. आजपासून (शुक्रवार) त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे अभिषेकही पुन्हा सुरू झाले आहेत आणि भाविकांना ओटीचे साहित्य मंदिरात नेण्यास मुभा देण्यात आली आहे. काल (गुरुवार) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची मासिक… Continue reading श्री अंबाबाई, जोतिबासह मुख्य मंदिरांतील दर्शन वेळ वाढल्याने भाविकांत समाधान

जेजुरीत भाविकांना तीन दिवस प्रवेश बंद !

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली असून, शनिवार ते सोमवार असे तीन दिवस भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती जेजुरीचे पो. नि. सुनील महाडिक यांनी दिली. ते आज (गुरुवार) जेजुरी येथील खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. कोरोनाचा… Continue reading जेजुरीत भाविकांना तीन दिवस प्रवेश बंद !

शेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने पारित केलेल्या नवी कृषी विधेयकाच्या कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन आणखीनच तीव्र होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेऊन कायद्यात काही कमतरता असेल तर सरकार चर्चेसाठी तयार आहे. शेतकरी संघटनांनी खुल्या मनाने चर्चेसाठी यावं असं आवाहन केलं. मात्र शेतकरी संघटनांनी सरकारचं हे आवाहन… Continue reading शेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम

रावसाहेब दानवे म्हणतात, शेतकरी आंदोलनात चीन, पाकिस्तानचा हात…

जालना (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. याच देशांनी सीएएच्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवलंं असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील… Continue reading रावसाहेब दानवे म्हणतात, शेतकरी आंदोलनात चीन, पाकिस्तानचा हात…

error: Content is protected !!