मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्म्हत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरण समोर आहे. यामध्ये अनेक अभिनेता- अभिनेत्रींना एनसीबीकडून समन्स देण्यात आले होते. आता एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल यांना पुन्हा समन्स बजावले आहे. अर्जुन रामपाल आता १६ डिसेंबरला एनसीबीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे.

मागील चौकशीनंतर एनसीबी कार्यालय सोडल्यानंतर अर्जुन रामपाल १३ नोव्हेंबर रोजी कोणत्याही निष्पाप व्यक्तीच्या प्रतिष्ठेची हत्या करणे चुकीचे आहे, असे म्हणाला होता. ड्रग्जशी माझा काही संबंध नाही. परंतु एनसीबी या प्रकरणात जे काम करत आहे ते बरोबर आहे. एनसीबी चौकशी करीत असलेल्या प्रकरणांमध्ये एनसीबीलाही खात्री पटली आहे की या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असे पुढे रामपाल म्हणाला होता.