जगाने धीर धरावा : कोरोना लसीबाबत अदर पुनावालांची प्रतिक्रिया

पुणे (प्रतिनिधी) : देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा हातपाय पसरू लागला आहे. सर्वांना लसीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यातच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड कोरोना लसीला जगभरातून मोठी मागणी होऊ लागली आहे. यावर सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना लस कधी देणार ? या प्रश्नावर पुनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे… Continue reading जगाने धीर धरावा : कोरोना लसीबाबत अदर पुनावालांची प्रतिक्रिया

इचलकरंजी महावितरण कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणाची ऊर्जामंत्र्यांकडून दखल  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरगुती व व्यावसायिक वीजजोडणी खंडित केल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी इचलकरंजी येथील महावितरण कार्यालयाची शुक्रवारी तोडफोड केली होती. या गंभीर प्रकरणाची ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दखल घेतली आहे. त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून व्यक्तिशः विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढविले. वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी औद्योगिक वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या साजनी शाखा… Continue reading इचलकरंजी महावितरण कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणाची ऊर्जामंत्र्यांकडून दखल  

ब्रिटिश कालखंडातील शेणगांवची प्राथमिक शाळा सोसतेय मरणकळा..!

गारगोटी (प्रतिनिधी) : ब्रिटिश कालखंडात १ नोव्हेंबर १८५० रोजी स्थापन केलेली भुदरगड तालुक्यातील शेणगांवातील प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीला आली आहे. दुरुस्तीअभावी इमारत मरणकळा सोसत आहे. तरी या शाळेचे तत्काळ पुनरुज्जीवन न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेणगांवचे सरपंच सुरेश नाईक यांनी दिला आहे. ७२ गुंठे क्षेत्रात वसलेल्या शाळेच्या इमारतीकडे शासन यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचबरोबर शेजारीच… Continue reading ब्रिटिश कालखंडातील शेणगांवची प्राथमिक शाळा सोसतेय मरणकळा..!

…अन्यथा, उर्जामंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही ! : मनसेचा इशारा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : आधीच कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना जगणे कठीण होऊन बसले आहे. असे असताना महावितरणने वीज बील माफी किंवा बिलामध्ये हप्ते देण्याबरोबरच व्याजदरात देखील सूट दिलेली नाही. उलट वसुलीच्या नावाखाली ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवून अन्याय चालवला आहे. हे वेळीच न थांबल्यास राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोल्हापूर… Continue reading …अन्यथा, उर्जामंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही ! : मनसेचा इशारा

भारत व्यापार बंदला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा पाठिंबा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) च्या वतीने जीएसटी विरोधात २६ फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या भारत व्यापार बंदला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि सर्व संलग्न संघटनेचा जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला. भारत व्यापार बंद आणि देशव्यापी चक्काजामबाबत चर्चा करण्यासाठी आज (शनिवार) कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजमध्ये बैठक पार पडली.… Continue reading भारत व्यापार बंदला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा पाठिंबा…

इचलकरंजी येथे वाहतूकींच्या नियमांबद्दल मार्गदर्शन शिबीर…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा पोलिस दल अंतर्गत इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण कक्ष आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांचे पालन या विषयावर कार्यक्रम आज (शनिवार) रोटरी क्लब येथे संपन्न झाला. अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी याबाबत मार्गदर्शन केले. जयश्री गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नाही. वाहन परवाना, हेल्मेट आणि… Continue reading इचलकरंजी येथे वाहतूकींच्या नियमांबद्दल मार्गदर्शन शिबीर…

पन्हाळा नगरपरिषदेस ई-रिक्षा भेट

पन्हाळा (प्रतिनिधी) : आसुर्ले – पोर्ले येथील एका फाउंडेशनतर्फे पन्हाळा नगरपरिषदेला व्यावसायिक सामाजिक बांधिलकी (CSR) मधून एक ई – रिक्षा भेट देण्यात आली. फाउंडेशनतर्फे एन. सी. पालिवाल यांनी ई – रिक्षाची चावी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना हस्तांतरित केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, आनंद कदम, श्री. मनिकंदन, श्री. कामोजी, श्री. अग्रवाल आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी… Continue reading पन्हाळा नगरपरिषदेस ई-रिक्षा भेट

छ. शिवरायांना डोक्यावर नव्हे, तर डोक्यात घ्या : प्रा. ए. एस. भागाजे

कळे (प्रतिनिधी) : जीवन म्हणजे संघर्षाची कर्मभूमी आहे त्याच ताकदीने परिस्थितीचा मुकाबला करा, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रामाण्य मानून वाटचाल केल्यास यशाच्या अच्युत्य शिखरावर पोहचू शकाल, शिवरायांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जा, असे आवाहन प्रा. ए. एस. भागाजे यांनी बळपवाडी (ता. पन्हाळा) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. त्यानंतर सिद्धेश कुपले यांनीही… Continue reading छ. शिवरायांना डोक्यावर नव्हे, तर डोक्यात घ्या : प्रा. ए. एस. भागाजे

बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी ‘आरपीआय’चा मंत्रालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा : गुणवंत नागटिळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने सोमवार २२ रोजी मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५०० कामगार सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की,… Continue reading बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी ‘आरपीआय’चा मंत्रालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा : गुणवंत नागटिळे

चंदगडमध्ये शिवजयंती उत्साहात…

चंदगड (प्रतिनिधी) : अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज चंदगड नगरपंचायत येथील सभागृह हॉलमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष प्राची काणेकर यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक शिवानंद हूंबरवाडी, झाकीर नाईक, दिलीप चंदगडकर, अभिजित गुरबे, सचिन नेसरीकर, अॅड. विजय कडूकर, कलीम मदार, नगरसेविका मुमताज मदार, संजीवनी चंदगडकर,… Continue reading चंदगडमध्ये शिवजयंती उत्साहात…

error: Content is protected !!