महापालिका निवडणूक : प्रभाग आरक्षणाची ‘लॉटरी’ फुटली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली. सर्व ८१ प्रभागांचे आरक्षण निश्‍चित झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरात आता निवडणूक रणधुमाळीला वेग येणार आहे. आज (सोमवार) संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ही प्रक्रिया पूर्ण झाली. सोडतीदरम्यान या परिसरात इच्छुक उमेदवार व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्या टप्प्यात अनुचित जाती प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत झाली. त्यानंतर… Continue reading महापालिका निवडणूक : प्रभाग आरक्षणाची ‘लॉटरी’ फुटली…

शिवसेनेला धक्का : माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक (प्रतिनिधी) : शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. फडणवीस म्हणाले की, पक्षापासून दूर गेलेले सानप आज पुन्हा एकदा भाजपमध्ये परतले आहेत. कुंभमेळ्यांच्या वेळी सानप यांनी खूप चांगल्या… Continue reading शिवसेनेला धक्का : माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

‘पीओपी’प्रकरणी मार्ग काढणार : खा. संजय मंडलिक (व्हिडिओ)

कुंभार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान खा. संजय मंडलिक यांनी ‘पीओपी’प्रकरणी मार्ग काढणार, असे आश्वासन दिले.  

अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धवजी फडणवीसांना सोबत घेऊन पंतप्रधानांना भेटा..!

मुंबई ( प्रतिनिधी) : मुंबईतील मेट्रो कारशेडवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविववारी जनतेशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. तर कारशेडवर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधान मोदींना भेटण्याचा सल्ला दिला आहे. टीम इंडिया असे समजून काम करा उद्धवजी… आताही वेळ आहे.… Continue reading अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धवजी फडणवीसांना सोबत घेऊन पंतप्रधानांना भेटा..!

ऊसात वाकुरी मारलेला ‘मी’ जातिवंत शेतकरी : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) :  कोरड्या नदीत पाण्यासाठी खड्डे खोदलेला आणि ऊसात वाकुरी मारलेला मी जातिवंत शेतकरी आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच पर्यटनासाठी बांधा-बांधावर जाणारा मी नव्हे, असेही मुश्रीफ पुढे म्हणाले.  ते कागल शहरातल्या जाधव मळ्यातून करनुरकडे जाणाऱ्या पानंद रस्त्याच्या शुभारंभावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते. यावेळी करनूर पानंद, वंदूर… Continue reading ऊसात वाकुरी मारलेला ‘मी’ जातिवंत शेतकरी : ना. हसन मुश्रीफ

गरज पडली तर पवार मोदींनाही भेटणार : नवाब मलिक

मुंबई (प्रतिनिधी) : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता विरोधक आणि ठाकरे सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने आता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोठी भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्याशी बोलून… Continue reading गरज पडली तर पवार मोदींनाही भेटणार : नवाब मलिक

मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे घेताच भाई जगतापांचा स्वबळाचा नारा

पुणे (प्रतिनिधी) : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार भाई जगताप यांची  शनिवारी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज (रविवार) त्यांनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असे कॅप्टन म्हणून माझे मत आहे, असे जगताप यांनी म्हटले आहे.    मुंबई महापालिकेत एकेकाळी काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते.… Continue reading मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे घेताच भाई जगतापांचा स्वबळाचा नारा

मुंबईकरांना आणखी त्रास नको; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे, अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून संवाद साधला. यावेळी त्यांनी कांजूरमार्ग मेट्रो… Continue reading मुंबईकरांना आणखी त्रास नको; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ; लोक आडवं करणारच

मुंबई (प्रतिनिधी) : एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. संजय राऊत हे बघून ठेवा. विसरू नका. अति तिथे माती होणारच, अशा शब्दांत ट्विट करून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला… Continue reading मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ; लोक आडवं करणारच

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर मुंबईतील एका तरूणीने बलात्काराचा आरोप केला आहे. ही तरूणी बॉलिवूडमध्ये आपले करीअर करण्यासाठी आली होती. तिच्या आरोपांमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे.  सोरेन यांनी ५ सप्टेंबर २०१३ मध्ये मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर मला ठार मारण्याची धमकी दिली, असे या  तरूणीने… Continue reading झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप

error: Content is protected !!