२ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी व्यवस्थापकाला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरीतील एका फुटवेअर कंपनीमध्ये साहित्याची परस्पर विक्री करून २ लाख ३ हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी, व्यवस्थापक राजेंद्र दत्तात्रय सावंत (वय ३२ रा. हरिपूररोड, सांगली) याला राजारामपुरी पोलीसांनी अटक केली. याप्रकरणी विभागीय व्यवस्थापक पार्थ संजय महेश्वरी (वय २४ रा. मकराना, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपीला आज (गुरुवार) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने… Continue reading २ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी व्यवस्थापकाला अटक

तळसंदेमध्ये किरकोळ वादातून युवकाचा खून

पेठवडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे जमिन आणि घराजवळील असणाऱ्या कुंपणाच्या वादातून युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. अविनाश भगवान कांबळे (वय ३५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तळंसदे येथील भगवान सहदेव कांबळे आणि शिवाजी रामू कांबळे या चुलत भावांमध्ये जमिनीचा आणि घराशेजारील कुंपणावरून अनेक… Continue reading तळसंदेमध्ये किरकोळ वादातून युवकाचा खून

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…

कोल्हापूर (सुजाता पोवार) : संपूर्ण मानवजात जिच्यावर अवलंबून आहे, तीच ‘स्त्री’ आजही असुरक्षितच आहे. आपण तंत्रज्ञानात, वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षणात दिवसेंदिवस प्रगती करत आहोत. पण एक माणूस म्हणून आपण खरंच प्रगत आहोत का..? रोज सकाळच्या चहासोबत आपण स्त्रियांवरील अत्याचाराच्या,बलात्काराच्या घटना ऐकतोय, पाहतोय, वाचतोय आणि, ‘काय व्हायचं या देशाचं..?’, असं म्हणून एक निश्वास सोडतोय. इथंच एक नागरिक… Continue reading स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एकावर गुन्हा

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडित तरुणीने अब्दुलरजाक नजरूद्दीन मुल्लानी (रा. कवठेमंहाकाळ, जि. सांगली) त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अब्दुलरजाक मुल्लानी याने लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर सांगली, मिरज आणि कोल्हापूर याठिकाणी अत्याचार करून त्याचे अश्लिल… Continue reading लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एकावर गुन्हा

ऐडकाच्या हल्ल्यात तरुण जखमी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून ऐडक्याने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. विनायक अनंत गायकवाड (वय २८, रा. नाळे कॉलनी, संभाजी नगर) असे जखमीचे नाव आहे. त्याने आकाश आनंदराव वाजोळे (वय २७, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) आणि परशुराम उर्फ पप्पू कोडुरकर (वय २६, रा. गजानन महाराज नगर, संभाजीनगर) या दोघांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली… Continue reading ऐडकाच्या हल्ल्यात तरुण जखमी…

मस्करी केल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत चार जखमी

कोल्हापूर  ( प्रतिनिधी) : विचारे माळ येथे चेष्टा-मस्करी केल्याच्या कारणातून दोन कुटुंबात झालेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाबासो कांबळे यांनी राजू पन्हाळकर यांच्या नातेवाईकांचे मस्करी केली. या रागातून कांबळे आणि पन्हाळकर या दोन कुटुंबीयांमध्ये मारामारी झाली. यात ललिता कांबळे,… Continue reading मस्करी केल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत चार जखमी

दहशत माजवणाऱ्यांना विरोध केल्याप्रकरणी मारहाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दौलत नगर येथे दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांना विरोध केल्याप्रकणी  एकास बेदम मारहाण करण्यात आली. यात गोपीचंद भीमराव नलवडे (वय ४९, रा. शाहूनगर राजारामपुरी) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी ७ जणांच्या विरोधात राजारामपुरी पोलिसा ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री दौलत नगर येथील दत्तवाडकर… Continue reading दहशत माजवणाऱ्यांना विरोध केल्याप्रकरणी मारहाण

कारच्या धडकेत दोघेजण जखमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोटरसायकलला कारची धडक लागून २ तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. प्रवीण बाबुराव पोवार (वय ३०, रा. सडोली दुमाला, ता. करवीर) आणि तुषार पाटील अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी प्रवीण पोवार याने अज्ञात कार चालकाच्या विरोधात आज (सोमवार) शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रवीण… Continue reading कारच्या धडकेत दोघेजण जखमी

मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून : मणेर मळा येथील घटना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : किरकोळ वादातून मुलग्याने कात्रीने भोसकून वडिलांचा आज (रविवार) खून केला. चंद्रकांत भगवान सोनुले (वय 48, रा. मुळ गाव भिलवडी, जि. सांगली) सध्या राहणार (इंद्रजीत कॉलनी मणेरमळा, उचगाव, ता.करवीर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा ज्ञानेश्वर चंद्रकांत सोनुले (वय 24) याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मणेर… Continue reading मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून : मणेर मळा येथील घटना

नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एका तरुणास शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुंबईतील दाम्पत्याने तीन लाख १ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अभिजीत राजाराम माने (वय ३४ रा. येळावी, जि. सांगली) सध्या  कोल्हापूर राहणार माने यांनी विजय बडे व त्याची पत्नी भाग्यश्री बडे (रा. नालासोपारा, मुंबई) या दोघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंद केली आहे. पोलिसांकडून समजलेली… Continue reading नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक

error: Content is protected !!