कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून ऐडक्याने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. विनायक अनंत गायकवाड (वय २८, रा. नाळे कॉलनी, संभाजी नगर) असे जखमीचे नाव आहे. त्याने आकाश आनंदराव वाजोळे (वय २७, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) आणि परशुराम उर्फ पप्पू कोडुरकर (वय २६, रा. गजानन महाराज नगर, संभाजीनगर) या दोघांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनायक गायकवाड आणि आकाश वाजोळे या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य आहे. त्या रागातून आकाश वाजोळे आणि त्याचा मित्र परशुराम कोडुरकर या दोघांनी विनायक गायकवाड याला घराबाहेर बोलावले. त्याला आयसोलेशन हॉस्पिटल जवळील वाळू अड्ड्यामध्ये नेऊन त्याच्यावर ऐडकायने हल्ला केला. त्यामध्ये विनायक गायकवाड गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी विनायक गायकवाड यांनी आकाश वाजोळे आणि परशुराम कोंडुरकर या दोघांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.