कोल्हापुरात बंगला फोडून ६० हजारांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दसरा चौकातील सीता कॉलनीमधील एका बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी  रोख रक्कम व दागिने असा सुमारे ६० हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी प्रदीप दत्तात्रय पाटील (वय ३०) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सीता कॉलनीमध्ये राहणारे प्रदीप पाटील हे काही कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून… Continue reading कोल्हापुरात बंगला फोडून ६० हजारांचा मुद्देमाल लंपास

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावावर गुन्हा

सांगली (प्रतिनिधी) : मंदिरात चप्पल घालून आल्याच्या वादातून दोन गटात राडा झाला. ही घटना जिल्ह्यातील आटपाडीमधील मासाळवाडी गावामध्ये घडली. यावेळी २ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपा आमदार पडळकर यांचे भाऊ जि. प. सदस्य ब्रह्मदेव पडळकर यांचा समावेश आहे. मासाळवाडी गावामध्ये दोन गटात जोरदार राडा… Continue reading भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावावर गुन्हा

पाचगांव येथे पूर्ववैमनस्यातून तरूणाला मारहाण : दोघांवर गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील पाचगांव येथे पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुरज शांताराम भालकर (वय २५, रा. अण्णाभाऊ साठेनगर) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी गणेश शांताराम साठे  (रा. पाचगांव) आणि एका अनोळखी इसमाविरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरज भालकर हे आपल्या घरासमोर… Continue reading पाचगांव येथे पूर्ववैमनस्यातून तरूणाला मारहाण : दोघांवर गुन्हा

दारूला पैसे दिले नसल्याच्या रागातून एकास मारहाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रजपूत वाडी येथे दारूला पैसे दिले नसल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण करण्यात आली. विष्णू भगवान माने (वय ३२, रा. प्रयाग चिखली) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्याने शंकर आनंदा लोहार (रा. प्रयाग चिखली) याच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विष्णू माने हे आपली मुलगी आजारी… Continue reading दारूला पैसे दिले नसल्याच्या रागातून एकास मारहाण

फटाके उडवण्यावरून एकास मारहाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथे, रस्त्यावर फटाके का उडवतोस? असा जाब विचारत एकाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये केतन राजेश यादव (वय २२, रा. आनंद स्वरुप पार्क, कसबा बावडा) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याने राज मगदूम आणि अनोळखी इसम अशा दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,… Continue reading फटाके उडवण्यावरून एकास मारहाण

कणेरीवाडी येथे टायर फुटून सिमेंटचा ट्रक पलटला    

करवीर (प्रतिनिधी) : पुणे– बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी येथे ट्रकचा (एमएच ०९ ईएम ८०४५) उजव्या बाजूचा टायर फुटल्याने ट्रक दुभाजकाला धडकून जागीच पलटी झाला. ही घटना कणेरीवाडी फाट्याजवळ महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोर आज (शुक्रवारी) सकाळी ९.१० वाजता घडली. यात चालक मुजुमिल हवालदार (रा.चिकोडी) हा किरकोळ जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक सिमेंट घेऊन पुण्याकडे चालला होता.… Continue reading कणेरीवाडी येथे टायर फुटून सिमेंटचा ट्रक पलटला    

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी सुनील गुट्टेला अटक

मुंबई (प्रतिनिधी) : बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी रत्नाकर गुट्टे याचा मुलगा सुनील गुट्टे याला आज (गुरूवार) अटक करण्यात आली. जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनायाने ही कारवाई केली आहे. सुनील याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  सुनील गुट्टे हे सुनील हायटेक इंजीनिअरिंग लिमिटेडचे संचालक आहेत. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसीचा वापर करणे.… Continue reading बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी सुनील गुट्टेला अटक

कृणाल पंड्याने दुबईहून ‘या’ वस्तू आणल्या : विमानतळावर ठोठावला दंड

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर दुबईहून आलेल्या  मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. डिपार्टमेंट ऑफ रेवेन्यू इंटेलीजेंस (डीआरआय) ने त्याच्यावर अधिक प्रमाणात  सोने आणि इतर मौल्यवान वस्तू सोबत आणल्याचा आरोप करत त्याला दंड ठोठावला.   दरम्यान, मर्यादीत क्षमतेपेक्षा जास्त सोने बाळगल्याची आपली चूक पांड्याने मान्य केली. आपल्याला… Continue reading कृणाल पंड्याने दुबईहून ‘या’ वस्तू आणल्या : विमानतळावर ठोठावला दंड

कळंबा कारागृहात शौचालयात सापडला मोबाईल…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामधील कर्मचाऱ्यांना एका बराकीच्या शौचालयात मोबाईल हँडसेट मिळून आला. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्यावतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज सायंकाळी कळंबा कारागृहातील एका बराकमधील शौचालयात, कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना एक मोबाईल हँडसेट मिळून आला. याप्रकरणी एका कैद्याकडे कर्मचाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. कारागृह… Continue reading कळंबा कारागृहात शौचालयात सापडला मोबाईल…

कोल्हापूर बाजारसमितीनजीक ट्रकचालकाची आत्महत्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर बाजार समितीनजीकच्या बागेमध्ये एका ट्रकचालकाने झाडाला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली. कृष्णात महादेव चव्हाण (वय ३२, रा. पोर्ले, ता पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. कृष्णात चव्हाण हे कोल्हापुरातील बाजार समिती व मार्केट यार्ड परिसरातील काही ट्रकवर चालक म्हणून नोकरी करत होते. आज (बुधवार) सायंकाळच्या सुमारास त्यांनी बाजार समितीजवळ असणाऱ्या बागेतील झाडाला… Continue reading कोल्हापूर बाजारसमितीनजीक ट्रकचालकाची आत्महत्या

error: Content is protected !!