कराडमधील सराईत दुचाकी चोरट्याला कोल्हापुरात अटक : २ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आरळे येथे कराड शहरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला आज (शनिवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आकाश उर्फ सोन्या आनंदा पाटसुपे (वय २८, रा. मुजावर कॉलनी, मार्केट यार्ड, ता. कराड, जिल्हा सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख १० हजारांच्या पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.… Continue reading कराडमधील सराईत दुचाकी चोरट्याला कोल्हापुरात अटक : २ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर कोरोना अपडेट : आजअखेर १, ११४  रुग्णांवर उपचार सुरु

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात २ मृत्यू झाले असून १०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – २८, आजरा – १, भुदरगड – १, चंदगड – १, गडहिंग्लज – ७, गगनबावडा – ०, हातकणंगले – ११, कागल – ३,  करवीर… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : आजअखेर १, ११४  रुग्णांवर उपचार सुरु

स्वरुप उन्हाळकरचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जपानमध्ये पार पडलेल्या ‘टोकियो २०२०’ या पॅरालिंपिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल या क्रीडा प्रकारात चौथा क्रमांक पटकवल्याबद्दल आंतरराष्ट्रीय शूटर स्वरुप महावीर उन्हाळकर याचा सत्कार आज (शनिवार) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर जिल्हा पॅरालिंपिक असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा मेन अँन्ड वुमेन रायफल असोसिएशन… Continue reading स्वरुप उन्हाळकरचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार  

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सहा कोटींचा दहा किलो सोन्याचा मुकुट अर्पण…

पुणे (प्रतिनिधी) :  आज संपुर्ण राज्यात गणरायाचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. पुण्यातील प्रसिध्द असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भक्तानं तब्बल दहा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या सोन्याच्या मुकुटाची किंमत सुमारे सहा कोटी रुपये इतकी आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठापना… Continue reading श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सहा कोटींचा दहा किलो सोन्याचा मुकुट अर्पण…

कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णसंख्या शंभरच्या आत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ५ मृत्यू झाले असून १०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १९, आजरा – ०, भुदरगड – ०, चंदगड – ०, गडहिंग्लज – ५, गगनबावडा – ०, हातकणंगले – ११, कागल – ३,  करवीर… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णसंख्या शंभरच्या आत

राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४० जण हद्दपार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गणेशोत्सव काळात शांतता रहावी या साठी राजारामपुरी पोलिस ठाणे हद्दीतील ४० रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गणेश उत्सवाच्या काळातील दहा दिवसांकरीता कोल्हापूर आणि करवीर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश करवीर विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी काढले आहेत. अशी माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.

मोबाईल शॉपी फोडणारा सराईत चोरटा कोल्हापुरात जेरबंद..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात राजारामपुरी येथील माऊली पुतळा परिसरात आज (गुरुवार) राजारामपुरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा लावून कराड शहरात मोबाईल शॉपी फोडणाऱ्या सराईत चोरट्यास जेरबंद केलं. संभाजी राजू कांबळे (वय २२, रा. मुंढे, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख २ हजार ६०० रुपये किमतींचे १६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.… Continue reading मोबाईल शॉपी फोडणारा सराईत चोरटा कोल्हापुरात जेरबंद..

माजी खा. राजू शेट्टी यांची मेघोली तलावाच्या दूर्घटनाग्रस्त भागास भेट… 

कडगाव (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी मेघोली तलावाच्या नुकसानग्रस्त भागाला आज (गुरुवार) भेट दिली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नवले येथील जिजाबाई मोहिते यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. राजू शेट्टी म्हणाले की, हा तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. तर जिजाबाई मोहिते या महिलेचा… Continue reading माजी खा. राजू शेट्टी यांची मेघोली तलावाच्या दूर्घटनाग्रस्त भागास भेट… 

जिल्ह्यात मागील चोवीस तासात १०५ कोरोना पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १०५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून ११४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३५, आजरा – ३, भुदरगड – २, चंदगड – ०, गडहिंग्लज – ५, गगनबावडा – ०, हातकणंगले – ११, कागल – ३,  करवीर… Continue reading जिल्ह्यात मागील चोवीस तासात १०५ कोरोना पॉझिटिव्ह…

कोल्हापुरात यशवंत भालकर फौंडेशनची ‘नृत्यसंगम २०२१’ अंतिम फेरी पार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळअष्टमीच्या निमित्ताने यशवंत भालकर फौंडेशन आयोजित आणि अरूण नरके फौंडेशन प्रस्तुत नृत्यसंगम २०२१ ही ऑनलाईन नृत्यस्पर्धा घेण्यात आली होती. याची अंतिम फेरी घेण्यात आली. दैवेज्ञ बोर्डिंग येथे अरूण नरके यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. नरके फौंडेशनचे चेअरमन चेतन नरके यांच्या हस्ते नटराज पुजन तर बाळासाहेब कोडोलीकर यांचे हस्ते सन्मानचिन्हांचे पुजन झाले. यावेळी… Continue reading कोल्हापुरात यशवंत भालकर फौंडेशनची ‘नृत्यसंगम २०२१’ अंतिम फेरी पार…

error: Content is protected !!